श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र | Shree Akkalkotswami Stotra |ॐ नमो श्री गजवदना | गणराया गौरीनंदना |

|| श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ||

श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र | Shree Akkalkotswami Stotra

ॐ नमो श्री गजवदना | गणराया गौरीनंदना |
विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||


नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्मा ता भगवती |
ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया |
स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन |
करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां |
स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||

नांव गांव खुद्द स्वामींचेमीं चे| किंवा त्यांच्या मातापित्यांचे |
कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें |
तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं |
स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||

कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण |
आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण |
तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||


मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान |
काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें |
ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण |
सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थया त्रेसी केले प्रयाण |
दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार |
तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले |
तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला |
जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झा ले ठिकाण |
अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत ली ला दाखविल्या || १८ ||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे |
आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे |
तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार |
अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी |
भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्का र दाखविले नाना |
शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार |
कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली |
जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद |
झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||

स्वामींचेमीं चेबोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें |
अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती |
ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||


कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या |
कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें |
कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार |
अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी |
म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||

न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें |
लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार |
अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया |
हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भा सेल सर्व सृष्टी |
सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं |
मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा |
ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९ ||

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी |
तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य को णी दिसेना || ४० ||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी |
आहेत तुमच्या चरणांपाशी | मग या त्रेस जाऊ कशाला || ४१ ||


अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं |
ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचपों ते || ४२ ||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी |
आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी |
काहींचहीं पडणार नाही कमी | समर्थां च्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी |
मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||


वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला |
भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे |
त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||


बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी |
गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें |
हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ |
स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||


शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी |
पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल |
क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार |
स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार |
निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||


बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली |
सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली |
समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला |
अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यां च्या व्याधी आणी विवंचना |
संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले |
म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी |
स्वामींना मीं यावी करुणा म्हणूनी | प्रा र्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था |
सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून |
समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून |
तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी |
ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौ लत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख |
गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||


तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा |
उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य |
म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून |
या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा |
वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी |
शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||


स्वामींचेमीं चेचित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या मीं एखाद्या मठांत |
बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||


माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर |
एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||

एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती |
ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न |
करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||


ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु ||

ॐ शांति:शांति:शांति: ||

|| श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र -माहात्म्य सम्पूर्ण ||


।।श्री स्वामी समर्थ।।

Sharing Is Caring:
       

Leave a Comment