श्री गुरुस्तवन स्तोत्र | Shree Gurustavan Stotra

श्री आनंदनाथ महाराज कृत श्री गुरुस्तवन स्तोत्र 

श्री गुरुस्तवन स्तोत्र 
श्री गुरुस्तवन स्तोत्र 

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा l भक्तवत्सल समर्था l

तव पदी ठेऊनि माथा l स्तवितो ताता तुजलागी ll १ ll

तू नित्य निरंजन l तुज म्हणती निर्गुण l

तूच जगाचे कारण l अहंभावे प्रगटलासि ll २ ll

तुझी स्तुती करावया l शक्ति नसे हरिहर ब्रह्मया l

परि अघटित तुझी माया l जी संशयभया निवारीत ll ३ ll

मूळ मूळीचा आकारू l तुज म्हणती श्रीगुरू l

सच्चित शक्तीचा आधारू l पुर्णाधारू ॐकारासी ll ४ ll

ऐसा तू देवाधिदेव l हे विश्व तुझेचि लाघव l

इच्छेचे वैभव l मूळब्रह्मी नटविले ll ५ ll

ऐसा तू बा अपरंपारू l या अनंत ब्रह्माचा आधारू l

चराचरीचा आकारू l पुर्णाधारू म्हणविले ll ६ ll

ऐशा तुजप्रती l स्तवावया अल्प माझी मती l

तू जाणसि हे चित्ती l विश्वव्यापक म्हणवूनी ll ७ ll

तरी देवा मतिदान l देणे तुझचि कारण l

जरी करणे समाधान l तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ll ८ ll

अहा जी निर्गुणा l विश्वव्यापक सगुणा l

सत्य निराकार निरंजना l भक्तांकारणे प्रगटलासी ll ९ ll

रूप पहाता मनोहर l मूर्ति केवळ दिगंबर l

कोटी मदन तेज निर्धार l ज्याच्या स्वरूपी नटले ll १० ll

कर्ण कुंडलाकृती l वदन पाहता सुहास्य मूर्ति l

भ्रुकुभ्रुकुटी पहाता मना वेधती l भक्त भाविकांचे ll ११ ll

भोवयांचा आकारू l जेथे भुले धनुर्धरु l

ऐसे रूप निर्धारु l नाही नाही जगत्रयी ll १२ ll

सरळ दंड जानु प्रमाण l आजानबा हु कर जाण l

जो भक्तां वरद पूर्ण l ज्याचे स्मरणे भवनाश ll १३ ll

ऐसा तू परात्परु l परमहंस स्वरूप सद्गु रू l

मज दावुनि ब्रह्म चराचरू l बोलविला आधारू जगतासी ll १४ ll

ऐशा तुज स्तवुनी l मौन्य पावले सहस्त्रफणी l

वेद श्वान होऊनी l सदा द्वारी तिष्ठती ll १५ ll

तेथे मी लडिवाळ l खरे जाणिजे तुझे बाळ l

म्हणवोनी पुरवि माझी आळ l माय कणवाळ म्हणविसी ll १६ ll

मी अन्यायी नानापरी l कर्मे केली दुर्विचारी l

ती क्षमा करोनि निर्धारी l मज तारी गुरुराया ll १७ ll

मनाचिया वारे l जे उठवि पापांचे फवारे l

तेणें भ्रमे भ्रमलो बारे l चुकवि फेरे भवाचे ll १८ ll

कायिक वाचिक मानसिक l सर्व पा पे झाली जी अनेक l

ती क्षमा करुनी देख l मज तारी गुरुराया ll १९ ll

माता उदरी तुम्ही तारिले l ते विस्मरण जिवासी पडिले l

हे क्षमा करोनि वहिले l मज तारी गुरुराया ll २० ll

पर उपकार विस्मरण l पापे केली अघटित कर्म l

अहंभाव क्रोधा लागून l सदाचि गृही ठेवियले ll २१ ll

हे क्षमा करोनि दातारा l मज तारावे लेकरा l

तुजविण आसरा l नाही नाही जगत्रयी ll २२ ll

मज न घडे नेम धर्म l न घडे उपासना कर्म l

नाही अंतरी प्रेम l परी ब्रीदाकरण तारणे ll २३ ll

नाम तुझे पाही l कदा वृथा गेले नाही l

ऐसे देती ग्वाही l संत सज्जन पुराणे ll २४ ll

मागे बहुत तारिले l हे त्यांही अनुभविले l

मज का अव्हेरिले l निष्ठुर केले मन किंनिमित्त ll २५ ll

तू विश्वाकारु विश्वाधारू l त्वांचि रचिले चराचरू l

तूचि बीज आधारू l व्यापक निर्धारु जगत्रयी ll २६ ll

चार देहाच्या सूक्ष्मी l तूचि झुलविशी निज लगामी l

हे ठेऊनी कारणी l अहंभाव तोडावया ll २७ ll

जन्ममरणाच्या व्यापारी l जे भ्रमुनी पडले माया भरारी l

ते सोडविशी जरी l निजनामे करुनिया ll २८ ll

ऐसा तू अनादि आधारू l तुज म्हणती वेद्गु रू l

परी हे व्यापुनी अंतरु l स्थिरचरी व्यापिले ll २९ ll

भावभक्ती चोखट l करणे नेणे बिकट l

नाम तुझे सुभट l तोडी घाट भवाचा ll ३० ll

हे जाणुनी अंतरी l पिंड ब्रह्मांड शोधिले जरी l

तरी सूक्ष्मीच्या आधारी l व्यापक नि र्धारी तूचि एक ll ३१ ll

म्हणोनि मौन्यगती l तुज निजानंदी स्तविती l

जरी बोलविसी वाचाशक्ती l तरी हा ती तुझ्या दयाळा ll ३२ ll

म्हणोनि स्तवने स्तवनी l तुज सांगणे एक जनी l

वश व्हावे भक्ती लागुनी l अवतार करणी जाणोनिया ll ३३ ll

अहंभाव तुटोनि गेला l प्रेमभाव प्रगटला l

देव तेथेचि राहिला l अनुभवशुद्धी खेळवी ll ३४ ll

यज्ञ कोटी करू जाता l जे फळ न ये हाता l

ते प्रेमभावे स्तविता l हरिते व्यथा भवाची ll ३५ ll

म्हणोनि सांगणे खूण l हा स्तव नित्य प्रेमे जाण l

जो वाचील अनुप्रमाण l अकरा वेळा निर्धारे ll ३६ ll

शुचिस्मित करूनि चित्ता l जो जपे प्रेमभरिता l

पुरवि तयांच्या मनोरथा l सत्य सत्य त्रिवाचा ll ३७ ll

हे लघु स्तव स्तवन l तारक जगाच्या कारण l

भक्तिभावे पूर्ण l चुके चुके भव फेरा ll ३८ ll

जो हा स्तव करील पठण l त्या घरी आनंद प्रकटेल जाण l

देवोनि भक्ता वरदान l तारक त्रिभुवनी करील ll ३९ ll

हा स्तव नित्य वाचा l भाव धरुनि जी वाचा l

फेरा चुकवा चौऱ्यांशीचा l गर्भवास पुन्हा नाही ll ४० ll

हे जगा हितकारी l चुकवि चुकवि भ्रमफेरी l

मृगजळ दाऊनि संसारी l मग तारी जीवाते ll ४१ ll

हे आनंदनाथांची वाणी l जग तारक निशाणी l

स्मरता झुलवी निरंजनी l योगी ध्या नी डुलविले ll ४२ ll

ऐसा ऐकता गुरुस्तवन l जागे केले सच्चित गुरुकारण l

केवळ तो हरि हर ब्रह्म l मुखयंत्रीचा गोळा पूर्ण ll

गुरुहृदय भुवन व्यापिले ll ४३ ll

तेणे होवुनि स्मरती l स्वये प्रगटली स्फूर्ती l

नाभी नाभी आवरती l अवतार स्थिती बोलतो ll ४४ ll

अयोनिसंभव अवतार l हिमालय उत्तरभागी निर्धार l

होऊनी पूर्ण हंस दिगंबर l व्यापू चराचर निजलीले ll ४५ ll

तेथून प्रगट भुवन l मग उद्धरु धरा जाण l

धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे l ४६ ll

ऐशी ध्वनी निर्धार l गर्जला गुरु दिगंबर l

सर्व देवी केला नमस्कार l आनंद थोर प्रगटला ll ४७ ll

शालिवाहन शके तिनशे चाळीस l शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास l

अवतार घेतला द्वितीयेस l वटछायेसी दिगंबरु ll ४८ ll

तै धरा आनंदली थोर l मज दावा रूप सुकुमार l

सेवा करीन निर्धार l पादकिंकरी हो ऊनिया ll ४९ ll

ऐसी गर्जना प्रकट l आनंद बोधवी हितार्थ l

गुह्य हे निजबोधार्थ l न बोलावे दांभिका ll ५० ll

l श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु l

हेही वाचा : गुरूचरित्र अध्याय 18 वा । Gurucharitra Adhyay 18गुरूचरित्र अध्याय 18 वा । गुरूचरित्र अध्याय अठरावा [Shree Gurustavan Stotra]

Sharing Is Caring:
       

Leave a Comment

Index