श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF । Shree Datta Bavani Marathi PDF

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF: श्री दत्त बावनी हे दत्त आणि त्यांचे अवतार मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे स्तोत्र आहे. हे स्तोत्र संकटमोचन स्तोत्र म्हणूनही ओळखले जाते.

दत्तबावनी हे स्तोत्र दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तीसाठी आणि संकटमोचनसाठी प्रसिद्ध आहे. अनेक भक्त नियमितपणे दत्तबावनीचा पाठ करतात.

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF
श्री दत्त बावनी मराठी

रचना:

दत्तबावनीची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. त्यांनी हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि. मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशाळेमध्ये या स्तोत्राची रचना झाली.

भाषा:

मूळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. मराठी भाषेतही भाषांतरे उपलब्ध आहेत.

PDF Nameश्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF । Shree Datta Bavani Marathi PDF
Size2.61 MB
ContentShree Datta Bavani Spited into 2 Columns
Siteswamiaai.com
PDF with DownloadYes
PDF information

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर : [श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF]

जय योगेश्वर दत्त दयाळ। तूच एक जगती प्रतिपाळ।।1।।

अत्रनसूये करूनी निमित्त। जगकारण प्रगटशी निश्चित ।।2।।

ब्रम्हाहरहरिचा अवतार। शरणांगतास तारण हार।।3।।

अंतर्यामी सच्चीत सुख। सद्गुरु द्विभू जगीचे सुमुख।।4।।

अंन्नपूर्णा झोळी हाती। शोभे शांती कमंडलू हाती।।5।।

काय चतुर्भुज षड्भुज सार। अनंत बाहु तू निर्धार।।6।।

शरणी आलो बाळ अजाण। उठ दिगंबर सुटतो प्राण।।7।।

ऐसी सहस्त्रार्जुनाची साद। तुष्ट होऊनी तू साक्षात।।8।।

रिद्धी सिद्धी तू देसी अपार। अंती मुक्ती महापद सार।।9।।

कशास करिसी आज विलंब। तुजविण मजसी नच आलंब।।10।।

तारीलास द्विज विष्णुशर्मा। श्राद्ध जेवीसी पाहून प्रेमा।।11।।

जम्भ दैत्य त्रासे देवांना। करुनी कृपा रक्षिलेस त्यांना।।12।।

दीती सुत माया विस्तारी। इंद्रीकरी त्या झणी मारी।।13।।

ऐशा कितीक केल्या लीला। वर्णु कोण शकेल तयाला।।14।।

भक्त कार्यास धावुनी येसी। मन निष्काम तयाचे करीसी।।15।

बोधे परशुराम यदुला। अकाम प्रल्हादासी मिळाला।।16।।

ऐसी कृपा तुझीच अगाध। का न ऐकीसी माझी साद।।17।।

धाव अंत पाहि न अनंता। अवचित ना करी शिशुचा अंता।।18।।

प्रेम द्विजा स्त्रीचे ही मिळाले। निसंदेह पुत्र रूप घडले।।19।।

कलियुगी स्मर्तृगामी कृपाळ। धोब्या तारी करी सांभाळ।।20।।

तारी विप्रापूर ज्वरातून । ब्राह्मण शेठ उद्धरीला तत्क्ष्ण।।21।।

करीन क्षमाझा का उद्धार। ये कर कृपादृष्टी एकवार।।22।।

शुष्क काष्ठास पान लागले। मजवरी उदासीन का झाले।।23।।

जरजर वृध्येची ही स्वप्ने। केली सुफळ तू पूर्णपणे।।24।।

दूर करुनि विप्राचे कोड। पूरविलेस तू त्याचे लाड।।25।।

दुभवीलेस तू वांझ म्हशीला। हरूनी दैन्य तोषीले त्याला।।26।।

वाल खाऊनी स्वये तोषला। प्रेमे सुवर्ण घट दिधला।।27।।

ब्राम्हण स्त्रीचा मृत्य नवऱ्याला। संजीवन तु दिधले त्याला।।28।।

पिशाचपीडा केलीस दूर। विप्रपुत्र उठविलास शुर।।29।

शूद्र हरी जो विक्रम दात। भक्ति रक्षी त्रिविक्रम तात ।।30।।

एकक्षणी तंतुक भक्ताला। शैलपर्वती पोहचविला।।31।।

दिसे एक हे अष्ट स्वरुप। धरी देव बहूरूप अरूप।।32।।

तोशुनी निज हा भक्त सुजात। दिधली ही प्रचिती साक्षात।।33।।

टाळी पीडा यवन नृपाची। चिंता नच तुज जातीपातीची।।34।

येवूनी राम न कृष्ण रूपात। केल्या लीला तू अगणित।।35।।

तरले पत्थर गणिका व्याध। पशुपक्षांची तुजला साद।।36।।

तुझे नाम अधमा उद्धरते। गाता काम कैसे न सरते।।37।।

आधीव्याधी उपाधी साऱ्या। स्मरणमात्र त्या टळती साऱ्या।।38।।

चले मुठ ना चेटुक शक्ती। स्मरता नर पावतसे मुक्ती।।39।।

डाकिणी शाकिणी महिषासुर। भुत पिशाच्चे जंद असूर।।40।।

होई मुठ क्षणाते नष्ट। दत्त धुन आळविता स्पष्ट।।41।।

जे गाती धुपास करोनी। मनापासोनी दत्त बावनी।।42।।

त्वये सुधरतील सारे लोक। उरेल ना कणभर ही शोक।।43।।

होई सिद्धी तयांची दासी। दुःख दैन्य ना पिडेल त्यासी।।44।।

बावन गुरूवारांचा नेम। करे पाठ बावन सप्रेम।।45।।

यथा शक्ती करी नित्य नियम। दंडी कधी तया ना यम।।46।।

बहुरुपी हा एक अभंग। भजता नडे न माया रंग।।47।।

सहस्त्र् नामी सत्य नाम ते। दत्त दिगंबर अंती उरते।।48।।

वंदु तुजला वारंवार। वेदची श्वास तुझे साकार ।।49।।

जिथे वर्णिता थकले शेष। रंक असा मी कोण विशेष।।50।।

अनुभव तृप्तीचे उद्गार। हसे तयाला पडेल मार।।51।।

तपसी तत्वमसी हा देव।बोला जय जय श्री गुरुदेव।।52।।

“बोला जय जय श्री गुरुदेव” – ३ वेळा

श्री दत्त बावनी मराठी image/Photo :[श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF ]

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF
Datta Bavani Marathi

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF । Shree Datta Bavani Marathi PDF:

Original गुजराती श्री दत्त बावनी चे मराठी रूपांतर :

श्री दत्तबावनी मराठी [From Original गुजराती]

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ॥ १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

श्री दत्त बावनी मराठी रूपांतर PDF

||Shree Datta guru Maharaj||

Sharing Is Caring:
       

Leave a Comment

Index