आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. घरातली भांडणे, दुःख, वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते . यावर उपाय म्हणून शी गुरुचरित्रातील १४ व्या आणि १८ व्या अध्याय आहे.
गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि १५ व्या शतकाच्या सुरवातीला रचला गेला. हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायंदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे.
या लेखा मध्ये आपण गुरुचरित्राच्या १४ व्या आणि १८ व्या अध्यायाचे महत्व त्याची फलश्रुती त्याचे नियम काय आहेत ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणांर आहोत.
गुरुचरित्राच्या १४ व्या आणि १८ व्या अध्यायाचे महत्व आणि फलप्राप्ती :
गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे .या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो.
१४व्या अध्यायाचे महत्व:
- हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो.
- या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते.
- हा अध्याय “क्रूर यवनास शासन” नावाने ओळखला जातो.
- यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायंदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे.
- सायंदेवाने वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायंदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळभक्तीचे आश्वासन दिले.
१४व्या अध्यायाचे फायदे:
- जीवनातील संकटांचा नाश होतो.
- सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो.
- मनःशांती आणि समाधान प्राप्त होते.
- भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते.
गुरुचरित्राचा १८ अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मी ची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीश्या होतात .
१८व्या अध्यायाचे महत्व:
- हा अध्याय गरिब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो.
- या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते.
- व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
- हा अध्याय “दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार” नावाने ओळखला जातो.
- यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे.
१८व्या अध्यायाचे फायदे:
- संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते.
- लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते.
- आर्थिक परिस्थिती सुधारते.
- व्यापारामध्ये वृद्धी होते.
गुरुचरित्रातील १४ वे आणि १८ वे अध्याय पठण कसे करावे?
पद्धत:
- पूजा मांडणी:
या अध्यायांचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही.
- वेळ:
तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठण करू शकता. - संकल्प:
तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता. - अध्याय निवड:
तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त १४ वा किंवा १८ वा अध्यायही वाचू शकता. - वाचन:
मोठ्या आवाजात वाचन करा, जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल. - आरती आणि नैवेद्य:
वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध, साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता.
संकल्प युक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी ?
संकल्प युक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी, देवतेला प्रसन्न करण्यासाठी, किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा. यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे.
श्री गुरुचरित्र पठणाचा संकल्प आणि नित्यसेवा:
संकल्प:
- शुद्धीकरण:
थोडं पाणी, अक्षता आणि फुल हातात घेऊन, स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करा. - उद्देश:
तुम्ही हे पठण का करत आहात ते स्पष्ट करा. (उदा. इच्छापूर्ती, अडचण दूर करणे, कुटुंबाच्या कल्याणासाठी इ.) - कालावधी:
तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात ते निश्चित करा. (उदा. 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार इ.) - प्रार्थना:
श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करा. - पाणी:
संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला.
कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प:
जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता . तुम्ही तुमच्या मित्रपरिवारा च्या सदस्यांसाठीही संकल्प घेऊ शकता.
तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा. या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता.
Note : स्वामीआई वेबसाईट वर संकल्प म्हणजे काय ? तो कसा करावा यावर पूर्ण लेख प्रकाशित आहे. संकल्प करण्यासाठी तो लेख नक्की वाचा.
संकल्प न करता तुम्ही खाली दिल्याप्रमाणे नित्यसेवा करू शकता :
नित्यसेवा:
- नित्यसेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नाही.
- श्री दत्तगुरूंचं स्थान: घरामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे.
- नित्यसेवेचा कालावधी: कमीत कमी सहा महिने नित्यसेवा करावी.
- अनुभव: नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही पठण नित्यक्रमात समाविष्ट करू शकता.
श्री गुरुचरित्राचे १४ व्या व १८ व्या अध्यायाच्या पथनाचे नियम काय आहेत ?
अध्याय पठणाचे नियम:
नॉनव्हेज:
- या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे.
- तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये.
- नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठण करू नये.
महिला:
- मासिक पाळीच्या 6-7 दिवसांमध्ये सेवा टाळावी.
- पिरेड्स दरम्यान मोबाईलवर सुद्धा पठण करू नये.
इतर नियम:
- गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम, रात्री जमिनीवर झोपणे, ब्रह्मचर्य यांसारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत.
- तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता.
अडचणी आणि परीक्षा:
- काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणे, कंटाळा, त्रास यांसारख्या अडचणी येऊ शकतात.
- अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी.
- नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवर विश्वास ठेवा.
विवाह योग येण्यासाठी गुरुचारीत्राचा १४ वा अध्याय का वाचू नये?
गुरुचरित्राचा १४ वा अध्याय आणि विवाह योग:
१४ वा अध्याय का वाचू नये?
असे म्हटले जाते की विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचू नये. कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे.
विवाह हा एक संसारिक बंधन आहे, आणि त्यामुळे विवाह इच्छुक व्यक्तीसाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही.
तरीही काय करावे?
जर तुम्हाला गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्तपणे वाचू शकता.
- तुम्ही हा अध्याय मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवसांमध्ये वाचू शकता.
- तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचू शकता.
विवाह योगासाठी काय करावे?
- तुम्ही गुरुचरित्राचा ३ रा, ७ वा आणि १० वा अध्याय नियमितपणे वाचू शकता.
- तुम्ही गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये श्री दत्तात्रेय आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकता.
- तुम्ही विवाह योग्य वय झाल्यावर लग्नासाठी योग्य वर/वधू शोधण्यासाठी प्रयत्न करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न : [गुरुचरित्रातील १४ व्या आणि १८ व्या अध्याय ]
-
गुरुचरित्राच्या पठनासाठी साठी किती दिवसांचा संकल्प घ्यावा?
७, ११, २१ किंवा १०८ दिवसांचा संकल्प घेता येतो.
-
गुरुचरित्राच्या पठना दरम्यान महिलांनी मासिक पाळी मध्ये कोणते नियम पाळावे ?
६-७ दिवस गुरुचरित्राच पठण टाळावे आणि पिरियड्समध्ये मोबाईलवर पठण टाळावे.
-
गुरुचरित्राच्या पठनाचे काय फायदे आहेत?
अडचणी दूर होतात, चांगल्या कर्मांना फल मिळते आणि दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद मिळतो.
-
नॉनव्हेज खाणाऱ्यांनी काय करावे?
गुरुचरित्राच्या पठन करताना पूर्णपणे शाकाहारी व्हावे लागेल.
-
गुरुचरित्राच्या पठना मध्ये अडचणी आल्यास काय करावे?
न डगमगता गुरुचरित्राची सेवा चालू ठेवावी आणि दत्तगुरु महाराजांवर विश्वास ठेवावा.
निष्कर्ष :
गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. वेदांइतकेच महत्त्व असल्यामुळे त्याला जनमानसात “पाचवा वेद” म्हणून ओळखले जाते. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वतींच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे. त्यात श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवनचरित्राचे वर्णन आहे.
गुरुचरित्राच्या १४ व्या आणि १८ व्या अध्यायला दत्त गुरूंच्या अघात लीलांमुळे महत्व प्राप्त झाले आहे . त्यांच्या नित्यं पठणाने अनेकांना दिव्या अनुभव सुद्धा येतात.
आपण या लेखा मध्ये गुरुचरित्राच्या १४ व्या आणि १८ व्या अध्यायाचे पठण कसे करावे? संकल्प युक्त सेवा कशी करावी ? त्याचे नियम काय ? अशा विविध गोष्टी आपण पहिल्या. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर कंमेंट मध्ये नक्कीच सांगा. ।।श्री स्वामी समर्थ।।