श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी | Mahalaxmi Stotra in Marathi

Mahalaxmi Stotra in Marathi

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे ।
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे। ।1।।

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी ।
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ।।2।।

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी।
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ।।3।।

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे ।
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ।।4।।

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती ।
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ।।5।।

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी ।
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ।।6।।

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या ।
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ।।7।।

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती ।
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ।।8।।

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी ।
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ।।9।।

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी ।
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ।।10।।

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते ।
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ।।11।।

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके ।
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ।।12।।

|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||

Mahalaxmi Stotra in Marathi

हे सुद्धा वाचा : दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम

Sharing Is Caring:
       

Leave a Comment