मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणता उपाय करावा ?: तूमचे एखादे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करताय प्रयत्न करताय आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी मला एक प्रकारचा प्रोत्साहन मिळावा.
एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळावी माझ्या स्वप्नांना पंख मिळावेत जेणेकरून जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल किंवा जे माझं लक्ष्य आहे त्यापर्यंत मी लवकर पोहोचू शकेल.
तर त्या साठी आपण आज या लेखा मध्ये सोपे उपाय पाहणार आहोत ज्या मध्ये तुम्हाला तुमचा जास्त वेळ द्यायची गरज नाही. दिलेल्या उपाय मध्ये वेगवेगळे प्रकारचे तीन उपाय सांगितले आहेत आणि तिन्ही उपाय १०० टक्के फलदायी आहेत तुम्हाला खाली दिलेल्या कोणत्याही एका उपायांवर काम करायचे आहे.
लाल चंदन आणि पाण्याचा उपाय:
साहित्य:
- एक ग्लास (कोणत्याही धातूचा)
- लाल चंदन पावडर
- स्वच्छ पाणी
कृती:
- संध्याकाळी झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरा.
- त्यात चिमूटभर लाल चंदन पावडर टाका.
- ग्लास हातात घेऊन त्या पाण्याकडे बघत 2-3 मिनिटे आपल्या इच्छेची विनंती करा.
- त्यानंतर 5 मिनिटे आपल्या इच्छेचा विचार करा आणि त्याची कल्पना डोळ्यासमोर उभी करा.
- ग्लास आपल्या झोपण्याच्या जागी बाजूला ठेवा आणि झोपी जा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि ग्लास मधील पाणी घेऊन घराबाहेर जा.
- एखाद्या जुन्या, मोठ्या झाडाखाली जा आणि पाणी झाडाला टाका.
- झाडाला स्पर्श करा आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
- हे 21 दिवस नियमितपणे करा.
महत्वाचे मुद्दे :
१. हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा.
२. आपली इच्छा सकारात्मक आणि स्पष्ट असल्याची खात्री करा.
३. 21 दिवसांमध्ये आपली इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील.
४. श्री स्वामी समर्थ!
गणपती चा इच्छा पूर्ती मंत्रचा उपाय कसा करावा ?
गणपती हे विघ्ननाशक देवता आहे. गणपती च्या या मंत्रांनी अनेकांना फायदा झाला आहे. हा मंत्राचा उपाय कसा करावा हे आपण पाहूया .
मंत्र:
ॐ गं गणपतये विघ्नविनाशने स्वाहा:
उपाय:
- दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करा.
- जप करताना आपली इच्छा मनात ठेवा.
- पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जप करा.
- नियमितपणे जप करत रहा.
फायदे:
- हा मंत्र विघ्न दूर करतो आणि इच्छा पूर्ण करतो.
- या मंत्राच्या जपने दुःख, समस्या, संकट आणि अडचणी दूर होतात.
- हा मंत्र आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद आणतो.[मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणता उपाय करावा ?]
मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी “55+5” तंत्र कसे काम करते ?
या उपयाला Law Of Attraction म्हणतात. या उपायांमध्ये आपल्या सभोवताली असलेल्या साकारात्म ऊर्जेचा उपयोग करून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. हि पद्धत खूप प्रभावशाली आहे आणि असंख्य लोकांना याचा अनुभव सुद्धा आला आहे.
- सामग्री:
- निळा पेन
- डायरी/वही/रजिस्टर
- वेळ:
- सकाळी ब्रह्ममुहूर्त
- संध्याकाळी झोपण्यापूर्वी
- दिवसभरात वेळ असल्यास
- प्रक्रिया:
- शांत जागेवर बसून डोळे बंद करा.
- तुमची इच्छा एका वाक्यात लिहा.
- वाक्याखाली “Thank you Universe” असे लिहा.
- हे पाच दिवस रोज करा.
- पूर्ण मजकूर ५५ वेळा ५ दिवस लिहा.
उदाहरणार्थ :
जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे. तर तुम्ही डायरीमध्ये खालीलप्रमाणे लिहाल:
माझं स्वतःचं 3BHK घर आहे. Thank you Universe. Thank you Universe. Thank you Universe….. (55 वेळा)
अत्यंत महत्वाचे मुद्दे:
१.लिहिताना आपले व्हायब्रेशन उच्च ठेवा.म्हणजेच साकारत्म राहा.
२.इच्छा पूर्ण होईपर्यंत इच्छा आणि स्वप्न विसरायचे नाही.
३.तुम्ही तुमची इच्छा इंग्रजी मध्ये लिहून ठेऊ शकता किंवा तुमच्या मातृभाषेत लिहून ठेऊ शकता.
४.दिवस मोजू नका आणि लेट गो करा.५ दिवसानंतर वही सुरक्षित ठिकणी ठेऊन द्या आणि विसरून जा कि तुम्ही ५ दिवस हे कार्य केले आहे, ज्यामुळे तुम्ही सगळी जबाबदारी युनिव्हर्स वर सोपवली आहे असं होईल.
५.विश्वास ठेवा की तुमची इच्छा पूर्ण होईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न : [मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणता उपाय करावा ?]
प्रश्न: स्वामींच्या भक्तीमध्ये इच्छा असू नये का?
उत्तर: होय, स्वामींच्या भक्तीमध्ये शुद्ध हेतू आणि आत्मसमर्पण महत्वाचे असते. आपण कठीण परिश्रम करतो आणि स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्या गरजा पूर्ण करतात.
प्रश्न: कोणता मंत्र जप करायचा आहे?
उत्तर: या उपायामध्ये कोणताही विशिष्ट मंत्र जप करण्याची आवश्यकता नाही. परंतु, आपल्या इच्छेपूर्तीसाठी श्री गणेशाचा मंत्र जप करणे शुभ मानले जाते.
प्रश्न: ५५५ इच्छा पूर्ण करण्याची तंत्र कोणती तंत्र आहे?
उत्तर: ही लो ऑफ अट्रॅक्शनवर आधारित एक तंत्र आहे. या तंत्रात आपण आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित करून विश्वाच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करतो.
प्रश्न: मला कोणत्याही वस्तूसाठी ही तंत्र करता येईल का?
उत्तर: होय, स्वतःचे घर, गाडी, नोकरी, प्रेम किंवा इतर कोणत्याही इच्छेसाठी ही तंत्र करता येते.
निष्कर्ष : [मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणता उपाय करावा ?]
स्वामींच्या कृपेने सर्वच स्वामी भक्ताचे थोड्या फार वेळाने चांगले होत असते. आपल्याला गरज आहे ती निस्वार्थ भक्तीची. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप श्रम घेत असतो.
परंतु कधी कधी त्यामध्ये आपल्याला यश येत नाही.त्या साठी आपण या लेखा मध्ये विविध प्रकारची तीन असे उपाय पहिले. तुम्हाला जो उपाय योग्य वाटत आहे तो करून बघा आणि धीर ठेवा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल.
जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नकीच कंमेंट करून सांगा आणि असेल इतर उपायासाठी स्वामी आई वेबसाईट वर विविध लेख वाचू शकता ।।श्री स्वामी समर्थ।।