संकल्प करणे म्हणजे काय? : शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही.
संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्र देवाला प्राप्त होते. यामुळे दररोजच्या पूजेमध्ये ही पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी.
संकल्प म्हणजे काय?
संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल.
संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नि पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपती समोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो.
संकल्प कसा करावा?
संकल्प करण्यासाठी आपल्याला ताम्हण लागतो. त्या ताम्हणामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचा आहे कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे.
गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदीकुंकू अक्षदा घ्यायचे आहेत. त्यानंतर फुल घ्यायचा आहे.[संकल्प करणे म्हणजे काय?]
संकल्प करताना आपल्याला खालील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत:
- आपल्याचे पूर्ण नाव
- आपले गोत्र
- आपण ज्या महिन्यांमध्ये संकल्प करत आहात तो महिना
- ती तारीख
- ज्या गावांमध्ये आपण राहत आहात तो गाव
संकल्प करताना खालील मंत्र म्हणायचा आहे:
संकल्प मंत्र
मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुरानोक्तफल प्रात्यर्थम,
मम सकल कुंटुंबिनाम, क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्यभीवृध्दार्थम पुत्रपौत्र, संततिवृध्दी, अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम,
प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम्,
अदित्यादि सकल ग्रहपीडाशांतर्थम् एवं सकलकामनासिध्दिद्वारा
धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम्,
श्रीस्वामी समर्थ देवता पूजनं एवं व्रतकथा श्रवणं च करिष्ये ।
संकल्प म्हणून झाल्यानंतर आपल्याला ज्या इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे. आणि त्यानंतर हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचा आहे.[संकल्प करणे म्हणजे काय?]
संकल्प करताना लागणारे साहित्य
1.गंगाजल किंवा शुद्ध पाणी
2.फुले, अगरबत्ती, धूप, दिवा
3.एक तांब्याचा ताह्मण
संकल्प करण्याची पद्धत
१. प्रथम, गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर शिंपडा.
२. नंतर, फुले, अगरबत्ती, धूप आणि दिवा लावून देवाची पूजा करा.
३. नंतर, तांब्याचा ताह्मण उचलून, आपला संकल्प करा.
४. संकल्प करताना, स्पष्ट आणि ठोस शब्द वापरा.
५. संकल्प करताना, आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा.
६. संकल्प घेतल्यानंतर, त्याचे पालन करण्यास वचनबद्ध रहा.[संकल्प करणे म्हणजे काय?]
संकल्पाचे उदाहरण
“हे परमेश्वरा , मी आज तुमच्या चरणी हा संकल्प करतो की मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी माझे अभ्यास नियमितपणे करेन आणि माझ्या शिक्षकांच्या सूचनांचे पालन करेन. मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
हे परमेश्वरा , तुमच्या कृपेने मला माझा संकल्प पूर्ण करण्यास मदत करा.”
आपण आपल्या इच्छेनुसार संकल्प करू शकता.
संकल्प कधी करावा?
संकल्प तुम्हाला सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे. तुम्ही 21 दिवस जर सेवा करणारा असाल तर रोज तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही.
संकल्प तोडला तर काय होते?
सेवेदरम्यान तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आलं किंवा तुम्हाला अचानक गावाला जावं लागलं तर तेवढे दिवस स्किप करून तुम्हाला नंतर परत ती सेवा कंटिन्यू करायचे आहे. [संकल्प करणे म्हणजे काय?]
असं नाही की तुम्हाला परत सुरुवातीपासून ती सेवा करायची आहे. तुम्ही संकल्प केलेला आहे जेवढे तुमचे पारायण झालेले असतील तेवढे पारायण तुम्ही केलेले आहेत. त्यानंतर जेवढी अडचणीचे दिवस आहेत तेवढे सोडून तुम्हाला पुढे ते पारायण सुरूच ठेवायचा आहे.
संकल्प कसा सिद्ध करावा?
सेवेदरम्यान तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्प केला होता ती इच्छा पूर्ण झाली तर हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. असं नाही की तुम्ही अर्धवट तुमचा संकल्प सोडून द्याल.
कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुमची इच्छा पूर्ण जरी झाली तरी तो संकल्प जेवढ्या दिवसांचा तुम्ही केलेला आहे तो संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे.
संकल्पाचा उद्देश
संकल्प हा केवळ इच्छापूर्तीसाठी घेतला जात नाही. संकल्प हा एक प्रकारचा संकल्पशक्तीचा विकास करण्यासाठी देखील केला जातो. संकल्प घेतल्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते आणि आपण कठोर परिश्रम करण्यास तयार होतो.
भक्तांना वारंवार पडणारे प्रश्न-[संकल्प करणे म्हणजे काय?]
संकल्प काय आहे?
पूजा/सेवा करताना इच्छित फळ मिळण्यासाठी देवतेला प्रतिज्ञा करणे.
संकल्प कधी करावा?
कोणत्याही पूजा/सेवेच्या आधी पहिल्या दिवशी.
संकल्प कसा करावा?
हातात पाणी घेऊन मंत्र म्हणा, इच्छा मनात बोला आणि पाणी तामनामध्ये सोडा.
मंत्र कोणता म्हणावा?
लेखात दिलेला मंत्र किंवा तुमच्या कुलदैवताचा मंत्र वापरा.
संकल्प किती दिवस करावा?
सेवा पूर्ण होईपर्यंत.
इच्छा पूर्ण झाली तर संकल्प सोडू शकतो?
नाही, निर्धारित दिवसांपर्यंत सेवा पूर्ण करा.
सेवेत अडथळा आली तर?
चुकलेले दिवस पुढे जोडून सेवा पूर्ण करा.
संकल्प केल्याने काय फायदा?
इच्छाशक्ती वाढते, ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळते.
निष्कर्ष-[संकल्प करणे म्हणजे काय?]
संकल्प हा एक महत्त्वाचा भाग आहे. संकल्प म्हणजे एखाद्या कार्यासाठी मनोमन ठरवणे. संकल्प घेतल्यामुळे आपल्या मनात त्या कार्याबद्दल एक दृढता निर्माण होते. आपण त्या कार्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार होतो.
कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. संकल्प घेतल्यामुळे आपण त्या पूजे किंवा सेवेचे महत्त्व समजून घेतो आणि त्यात पूर्णपणे सहभागी होतो.
संकल्प घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- संकल्प नेहमी स्पष्ट आणि ठोस असावा.
- संकल्प घेताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
- संकल्प घेतल्यानंतर त्याचे पालन करण्यास तयार असावे.