श्री शंकर महाराजांची बावनी हे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्य जीवनाचे सार असलेले स्तोत्र आहे. नित्य शंकर बाबांचे स्मरण आणि उपासना करताना, हे स्तोत्र प्रत्येक भक्ताच्या स्मरणात असावे आणि रोज एकदा तरी म्हणावे किंवा ऐकावे.
शंकर बावनीचे महत्त्व:
- संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास: जर तुम्ही संपूर्ण शंकर महाराजांची पोथी वाचू शकत नसाल तर, रोज शंकर बावनी म्हणणे किंवा ऐकणे हे उत्तम पर्याय आहे.
- शंकर महाराजांची कृपा प्राप्ती: या स्तोत्राच्या नित्य पठण आणि श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा
प्राप्त होते. - दिव्य जीवन: हे स्तोत्र शंकर महाराजांच्या दिव्य जीवनाचे दर्शन घडवते आणि त्यांच्या शिकवणींचा सारांश देते.
- आध्यात्मिक प्रगती: शंकर बावनीचे नियमित पठण आणि श्रवण आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त आहे.
PDF Name | Shankar Maharaj Bavani Pdf |
PDF Size | 2.00 MB |
PDF Date | 17/03/2024 |
PDF site | swamiaai.com |
सदगुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी
रुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु l गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरुर्साक्षात परब्रम्ह l तस्मैश्री गुरुवे नमः ll
जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा llधृ.ll
वाघांच्या सहवासात l बाळ प्रकटले रानात ll
चिमणाजीला दृष्टांत l देवूनी स्वगृही आलात ll१ll
असंख्य केल्या कृष्ण लीला l अंतापुरच्या गावाला ll
जो तो धावे बघण्याला l छकुल्या शंकरच्या लीला ll२ll
हिमनग शिखरावर फिरले l विश्वामधुनी संचारले ll
अक्कलकोटी श्री आले l विनम्र गुरुचरणी झाले ll३ll
शुभरायांच्या मठातून l किर्तन करिती जनार्दन ll
दत्तरूप त्या दाखवून l प्रकट झाले जनातून ll४ll
तेथे रंगता ते भजनी l प्रत्येकास दिसे नयनी ll
जिकडे तिकडे भक्तगणी l शंकररूपे ये दिसुनी ll५ll
मेहेंदळेच्या वाड्यात l उत्सव शिवरात्री करीत ll
वर्णपालटे शरीरात l शिवशंभूसम श्री दिसत ll६ll
श्रीपादवल्लभ दिसती कुणा l कुणा पंढरीचा राणा ll
कुणा भवानी कृष्ण कुणा l दर्शन देती भक्तांना ll७ll
जरी पुण्यातून नच जाती l असंख्य पत्रे तरी येती ll
हजार उत्सवाला असती l अनेक गावी श्री दिसती ll८ll
अल्लख वदता मुखातून l पिंड निघाली भूमीतून ll
पाथर्डीस हे शिवस्थान l भोवती नाथांचे ठाण ll९ll
नाथ समाधी मढीतली l तेथील शांत धुनी झाली ll
अल्लख देवूनी आरोळी l क्षणात प्रज्वलित केली ll१०ll
मेहेंदळे सौभाग्यवती l जीवन संपवण्या जाती ll
पूर्णत्वाला तिज नेती l रसाळ ज्ञानेश्वरी कथिती ll११ll
गिरीनारीच्या गिरी जाती l वायुभक्षण जे करिती ll
भोजन साधुना देती l संगती प्राणीही असती ll१२ll
कुरुक्षेत्रावर जी घडिली l मनास घटना ना पटली ll
गीता कैसी सांगितली l शंका कोणीतरी विचारली ll१३ll
बघता रोखुनी त्यावती l दिसली ज्योतिर्मय मूर्ती ll
कृष्णापरी त्या श्री दिसती l तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती ll१४ll
सोमवातीच्या शुभ दिवशी l स्वरूप लिंगात्मक दिसती ll
उत्कट प्रीती ज्या पाशी l तोच बघे त्या तेजाशी ll१५ll
महाराजांच्या जिभेवर l लिंग वसतसे खरोखर ll
समर्थ स्वामी गुरुवर l पूजन करिती सत्वर ll१६ll
समर्थ स्वामी माउलीने l तृप्त केले स्तनपाने ll
ऐसे सांगती अभिमाने l शिरसावंद्य गुरुवचने ll१७ll
प्रधान लंडनला जाती l तेव्हा मातापिता जाती ll
सदगुरुला मनी स्मरीती l तत्क्षण सन्मुख श्री येती ll१८ll
पर्वत गिरीनारी नेती l दत्त्प्रभुना बोलाविती ll
समक्ष अंत्यविधी करिती l शिष्य मनोरथ पुरविती ll१९ll
प्रधान झाले शिष्ठा प्रधान l लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ll
उत्कट भक्ती प्रीती महान l गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण ll२०ll
गाणगापूरला श्री जाती l रुद्रा घाटावर श्री बसती ll
निर्गुण पादुकांवरती l ब्राम्हण पूजा जी करती ll२१ll
महारांजाच्या पडे शिरी l जो तो मनी आश्चर्य करी ll
सन्मानाने मठांतरी l घेऊन येती श्री स्वारी ll२२ll
भस्मे वरती अति माया l पदपंकज शिरी ठेवूनिया ll
स्वरूप गुरुचे जाणाया l दृष्टी दिव्य दिली सदया ll२३ll
गुरूने आपला मज म्हणून l जवळी घ्यावे आवळून ll
ऐसी इच्छा प्रकटून l फुलारी दादा घे वचन ll२४ll
तत्क्षण शरीरी संचरून l आपणासारखे त्या करून ll
केले आश्वासन पूर्ण l कृतार्थ दादांचे जीवन ll२५ll
गणेश अभ्यंकर यांना l युद्धावरती असतांना ll
असंख्य गोळ्या पायांना l चाटुनी गेल्या खुणाविना ll२६ll
विजार चाळण सम झाली l तरीही जाणीव नच झाली ll
लीला कोणी ही केली l अंतरी जान कृपा झाली ll२७ll
सद्गुरू असता काशीत l ब्राम्हण वैदिक हिणवीत ll
भोंदू अजागळ अशिक्षित l जाणे काय कसे वेद ll२८ll
सागरगोटे झेलीत l कन्या खेळतसे तेथ ll
तिच्या मुखातून बोलवीत l बृह्स्पतीसम श्री वेद ll२९ll
नवरात्रीच्या अष्टमीस l शरीरी दुर्गेचा वास ll
करिती तांडव नृत्यास l अनंत नमने मातेस ll३०ll
सप्तचिरंजीव जे असती l त्यातील श्रेष्ठ असे विभूती ll
तो मी मारुती या जगती l स्वये मुखाने श्री वदती ll३१ll
नवले विनवी सदगुरुला l दावा विष्णूपद मजला ll
सागर तीरावर नेला l सुवर्ण पदपंकज दिसला ll३२ll
लांब चरण ते स्पर्शून l उर्मी उसळल्या मनातून ll
व्योमी बघता यर दिसून l किरीटी चमके लखलखून ll३३ll
तात्यावारती अति प्रीती l अनन्य शरणागती असती ll
तात्या जणू की प्रतिकुती l दुसरी सद्गुरूंची मूर्ती ll३४ll
परस्परांची बदलून l कामे करिती समजून ll
कुणा न ये हे कळून l कोण शिष्य नि गुरु कोण ll३५ll
समाधीतुनी प्रकटती l मिठीत रुद्रांना घेती ll
पृथ्वीभोवती फिरविती l साक्षित्वाची दिली प्रचिती ll३६ll
मी शंकर कैलासपती l अवतरलो या भूवरती ll
समज द्यावया जगाप्रती l कार्य असे हे ममचित्ती ll३७ll
विविध रंग या जगतात l इथले मात्र नसे तेथ ll
ज्ञात न कोणा हे होत l ज्ञान असे हे अतिगुप्त ll३८ll
स्वतःस कोणी ओळखिल l तो मज निश्चित जाणेल ll
धनदौलत जरी उधळील l तरीही त्याला नुमजेल ll३९ll
घे घे जाणुनी तू मजला l अथवा पश्चाताप भला ll
कार्यभाग न मम अडला l अडेल माझ्यावीन तुझला ll४०ll
कांचनसम हे अक्षरबोल l कोरूनी दगडावरती खोल ll
सुवेळी तुझला स्मरतील l शब्द सुधेसम हे अनमोल ll४१ll
केले तुझला गुह्य खुले l साधुनी अपुले घेई भले ll
शरणांगत मज जे आले l ते मी निश्चित उद्धारीले ll४२ll
अशक्य काम करी शक्य l ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ll
भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष ll४३ll
भिऊ नको मी पाठीशी l असता भीती तुला कैशी ll
वचनबद्ध जो भक्तांशी l का नच त्यावर विश्वाशी ll४४ll
योगक्षेम मी चालविण l ऐसे दिद्धले न वचन ll
त्याचे चिंतन मनी करून l चिंता द्यावी अर्पून ll४५ll
सद्गुरू येथुनी नच गेले l चिरंजीव ते असती भले ll
अनेक वेळा श्री उठले l समाधीतुनी प्रकटले ll४६ll
अंत जगाचा होईल l सुभक्त तितुके रक्षील ll
ऐसे ज्याचे दृढबोल l प्रीती अपेक्षी बहुमोल ll४७ll
ऐसा समर्थ स्वामीला l भव मनीचा सांगितला ll
भक्ती प्रीती दे मजला l परमार्थाचा मार्ग भला ll४८ll
मिठीत मजला घेवून l आईपरी घे चुंबन ll
माझा याळ असे म्हणून l कृतार्थ करी हे जीवन ll४९ll
बावन्नी भाऊदासाची l प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ll
प्राशन करता मिळायची l मधुरा भक्ती सद्गुरूंची ll५०ll
बावन्नी ज्याच्या स्मरणात l अमलभाव हा हृदयात ll
सद्गुरूंच्या तो सावलीत l हिच फल श्रुती पदरात ll५१ll
जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा ll५२ll
ll जय शंकर ll
ll श्री गुरुदेव दत्त ll