श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 3

॥ श्री गणेशाय नमः ॥

धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती ।

त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥

गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी मीं निवेदिले स्वचरित्र ।

आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥

निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार दाविती ।

काही वर्षे करोनी वस्ती । मंगळवेढे सोडिले ॥३॥

मोहोळमाजी वास्तव्य करीता । आप्पा टोळ झाले भक्त ।

तेथीचे साकल्य वृत्त । अल्पमती केवी वर्णू ॥४॥

स्वामी चरित्राचे हे सार । म्हणून केला नाही विस्तार ।

वर्णिता कथा समग्र । ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥

सवे घेउनी स्वामींसी मीं । टोळ जाती अक्कलकोटासी ।

अर्धमार्गावरुनी टोळांसी । मागे परतणे भाग पडे ॥६॥

टोळ आज्ञापिले सेवका । जोवरी आम्ही येउ का ।

तोवरी स्वामींसी मीं सोडू नका । येथेच मुक्काम करावा ॥७॥

टोळ गेलिया परतोनी । स्वामी चालले उठोनी ।

बहुत वर्जिले सेवकांनी । परी नच मानिले त्या ॥८॥

तेथोनिया निघाले । अक्कलकोटाप्रती आले ।

ग्रामद्वारी बैसले । यतिराज स्वेच्छेने ॥९॥

तेथे एक अविंध होता । तो करी तयांची थट्टा ।

परी काही चमत्कार पाहता । महासिद्ध समजला ॥१०॥

पूर्वपुण्यास्तव निश्चिती । आले चोळप्पाचे गृहाप्रती ।

स्वामींसी मीं जाणोनी ईश्वरमूर्ती । चोळप्पा करी आदर ॥११॥

चोळप्पाचे भाग्य उदेले । यतिराज गृहासी आले ।

जैसी कामधेनू आपण बळे । दरिद्रि याच्या घरी जाय ॥१२॥

पूर्वपुण्य होते गाठी । म्हणूनी घडल्या या गोष्टी ।

झाली स्वामीराज भेटी । परम भाग्य तयाचे ॥१३॥

धन्य धन्य तयाचे सदन । जे स्वामींचेमीं चेवास्तव्यस्थान ।

सुरवरां जे दुर्लभ चरण । तयाच्या घरी लागले ॥१४॥

योगाभ्यासी योग साधिती । तडी ता पडी मार्गी श्रमती ।

निराहार कितीक राहती । मौन धरिती किती एक ॥१५॥

एक चरणी उभे राहोन । सदा विलोकिती गगन ।

एक गिरीगव्हरी बैसोन । तपश्चर्या करिताती ॥१६॥

एक पंचाग्निसाधन करिती । एक पवनाते भक्षिती ।

कित्येक संन्यासी होती । संसार अवघा सांडोनी ॥१७॥

एक करिती किर्तन । एक मांडिती पूजन ।

एक करिती होमहवन । एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥

एक लोका उपदेशिती । एक भजना माजी नाचती ।

एक ब्राम्हण भोजन करिती । एक बांधिती देवालये ॥१९॥

परी जयाचे चरण । दुर्लभ सद्भक्तिवाचोन ।

केलियासी नाना साधन । भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥

योगयागादिक काही । चोळप्पाने केले नाही ।

परी भक्तिस्तव पाही । स्वामी आले सदनाते ॥२१॥

तयाची देखोनिया भक्ती । स्वामी तेथे भोजन करिती ।

तेव्हा चोळप्पाचे चित्ती । आनंद झा ला बहुसाळ ॥२२॥

तैपासून तयाचे घरी । राहिले स्वामी अवतारी ।

दिवसेंदिसें वस चाकरी । चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥

तेव्ही राज्यपदाधिकारी । मालोजीराजे गादीवरी ।

दक्ष असोनी कारभारी । परम ज्ञानी असती जे ॥२४॥

अक्कलकोटची प्रख्याती । तेव्हा काही विशेष नव्हती ।

परी तयांचे भाग्य निश्चिती । स्वामीचरणी उदेले ॥२५॥

तैपासून जगांत । त्या नगराचे नाव गाजत ।

अप्रसिद्ध ते प्रख्यात । कितीएक जा हले ॥२६॥

चोळप्पाचे गृहाप्रती । आले कोणी एक यती ।

लोका चमत्कार दाविती । गावात बात पसरली ॥२७॥

आपुली व्हावी प्रख्याती । ऐसे नाही जयांचे चित्ती ।

म्हणुनिया स्वामीराज यती । बहुधा न जाती फिरावया ॥२८॥

लोकांमाजी पसरली मात । नृपासी कळला वृत्तांत ।

की आपुलिया नगरात । यती विख्या त पातले ॥२९॥

राहती चोळप्पाचे घरी । दर्शना जा ती नरनारी ।

असती केवळ अवतारी । लीला ज्यां ची विचित्र ॥३०॥

वार्ता ऐसी ऐकोनी । राव बोलले काय वाणी ।

गावात यती येवोनी । फार दिवस जाहले ॥३१॥

परी आम्ही श्रुत पाही । आजवरी जाहले नाही ।

आता जावोनी लवलाही । भेटू तया यतिवर्या ॥३२॥

परी ते केवळ अंतर्ज्ञानी । ऐसी वार्ता ऐकली कानी ।

हे सत्य तरी येवोनी । आताच देती दर्शना ॥३३॥

रावमुखातून वाणी निघाली । तोचि यतिमूर्ती पुढे ठेली ।

सकल सभा चकित झाली । मति गुंगली रायाची ॥३४॥

सिंहासनाखाली उतरोन । राव घाली लोटांगण ।

प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद्गदित ॥३५॥

दृढ घातली मिठी चरणी । चरण धुतले नेत्राश्रूंनी ।

मग तया हस्तकी धरोनी । आसना वरी बैसविले ॥३६॥

खूण पटली अंतरी । स्वामी केवळ अवतारी ।

अभक्ती पळोनी गेली दूरी । चरणी भक्ती जडली तै ॥३७॥

सकळ सभा आनंदली । समस्ती पा ऊले वंदिली ।

षोडशोपचारे पूजिली । स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥

निराकार आणि निर्गुण । भक्तांसाठी झाले सगुण ।

तयांच्या पादुका शिरी धरोन । विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥

इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । ना ना प्राकृत कथा संमत ।

प्रेमळ भक्त परिसोत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 3

Sharing Is Caring:
       

Leave a Comment