श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4

॥ श्री गणेशाय नमः ॥

मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे ।

षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥

न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन ।

सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥

स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता ।

स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥

गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति ।

नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥

चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव ।

हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥

जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी ।

नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥

चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामी कृपा होता पूर्ण ।

लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥

कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति ।

नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥

चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता ।

सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वा मीसेवेचा ॥९॥

स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती ।

नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिसें वस दृढ जडली ॥१०॥

स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती ।

बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥

कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने ।

व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशा हूनी ॥१२॥

शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले ।

मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥

सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण ।

भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥

भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती ।

दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥

जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे ।

नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥

महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष ।

कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥

कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी ।

हासोनि म्हणती जनांसी । ढोंगिढों याच्या नादी लागला ॥१८॥

हा स्वामी नव्हे ढोंगी ढों । जो नाना भो ग भोगी ।

साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥

काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्या ढों ची पाऊले ।

यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥

ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले ।

जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥

पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण ।

ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥

एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी ।

तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥

तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती ।

श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥

दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात ।

समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥

दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे ।

हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥

कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती ।

नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥

कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती ।

कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥

संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती ।

क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥

क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति ।

म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥

स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात ।

ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लो टिती ॥३१॥

पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी ।

आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥

मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी ।

संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥

तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सा रे नेत ।

संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥

समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी ।

सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥

दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी ।

रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥

जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना ।

दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥

त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती ।

पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥

श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती ।

त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा ।

संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4

Also Read: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 1

Sharing Is Caring:
       

Leave a Comment