श्री स्वामी समर्थ स्तवन

श्री स्वामी समर्थ स्तवन

श्री गणेशाय नमः | श्री सरस्वत्यै नमः | श्री गुरुभ्यो नमः | श्री कुलदेवतायै नमः|

श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार- दिगंबर – यतीवर्य- श्री स्वामीराजाय नमः ||

ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ती |
व्दंव्दातीत गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ||

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं |
भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि ||

ओम रक्तांग , रक्तवर्ण पद्मनेत्र , सुहास्यवदनं , कथा- टोपी-च-माला दण्डकुमण्डलुधर , कटयांकर , रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक , विश्वनायक भक्तवत्सल, कलियुगे , श्रीस्वामीसमर्थवार्ताधारक
पाहि माम् | पाहि माम् | पाहि माम् |

आता करूया प्रार्थना | जय जयाजी अघहरणा |
परात्परा कैवल्यसादना | ब्रह्मानंदा यतीवर्या ||

जय जयाजी पुराणपुरुषा | लोकपाला सर्वेशा | अनंत ब्रह्मांडधीशा | वेदवध्या जगद्गुरु ||

सुखधामनिवासिया | सर्वसाक्षी करूणालया | भक्तजन ताराया | अनंतरूपें नटलासी ||
तूं अग्नि तूं पावन | तूं आकाश तूं जीवन |
तूंची वसुंधरा पूर्ण | चंद्र सूर्य तूंच पैं ||

तूं विष्णु आणि शंकर | तूं विधाता तू इंद्र |
अष्टदिक्पालादि समग्र | तूचं रूपें नटलासी ||

कर्ता आणि करविता | तूंच हवी आणि होता |
दाता आणि देवविता | तूंच समर्था निश्र्चयें ||

जंगम आणि स्थिर | तूंच व्यापिलें समग्र |
तूजलागीं आदिमध्याग्र | कोठें नसे पाहतां ||

असुनिया निर्गुण | रूपे नटलासी सगुण

ज्ञाता आणि ज्ञान | तुचं एक विश्वेशा ||

वेदाचांही तर्क चांचरे |शास्त्रातेंही नावरे ||
विष्णु शंकर एकसरें | कुंठीत झाले सर्वही ||

मी केवळ अल्पमती | करूं केवीं आपली स्तुती ||
सहस्त्रमुखही निश्चिती | शिणला ख्याती वर्णितां ||

दृढ ठेविला चरणीं माथा | रक्षावे मजसी समर्थ |
कृपाकटाक्षें दीनानाथा | दासाकडे पाहावें ||

आतां इतुकीं प्रार्थना | आणावीजी आपल्या मना |
कृपासमुद्रीं या मिना | आश्रय देईजे सदैव ||

पाप ताप आणि दैन्य | सर्व जावो निरसोन |
इहलोकीं सौख्यदेवोन | परलोक साधन करावें

दुस्तर हा भवसागर | याचे पावावया पैलतीर |
त्वन्नाम तरणी साचार | प्राप्त हो मजला ते ||

आशा मनीषा तृष्णा | कल्पना आणि वासना |
भ्रांती भुली नाना | न बाधोत तुझ्या कृपें ||

किती वर्णुं आपुले गुण | द्यावे मज सुख साधन |
अज्ञान तिमिर निरसुन | ज्ञानार्क हृदयीं प्रगटो पैं ||

शांती मनीं सदा वसो | वृथाभिमान नसो |
शोधा समाधान वसो | तुझ्या कृपेनें अंतरीं ||

भवदुःख हें निरसो | तुझ्या भजनीं चित्त वसो |
वृथा विषयांची नसो | वासना या मनातें ||

सदा साधू- समागम | तुझें भजन उत्तम |
तेणें होवो हा सुगम | दुर्गम जो भवपंथ ||

व्यवहारीं वर्ततां | न पडो भ्रांती चित्ता |
अंगी न यावी असत्यता | सत्यें विजयी सर्वदा ||

आप्तवर्गाचें पोषण | न्यायमार्गवलंबन |
इतुकें द्यावे वरदान | कृपा करूनि समर्था ||

असोनियां संसारात | प्राशीन तव नामामृत |
प्रपंच आणि परमार्थ | तेणें सुगम मजलागीं ||

कर्ता आणि करविता | तूंची एक स्वामीनाथा |
माझिया ठायी वार्ता | मीपणाची नसेची ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वराः |
गुरुः साक्षात् परं ब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नमः ||

सारांश

या स्तवनात श्री स्वामी समर्थांची अद्वितीय लीला आणि शक्ती वर्णन केली आहे. ते ब्रह्मांडाचे पिता, नवनाथांचे आदिनाथ, अनाथांचे जगन्नाथ, नरसिंह, योगीश्वर, यती, हिमालयवासी, अरवलीवासी, नर्मदेचे काठवासी, भीमातटीवासी, काली माता, कन्याकुमारी आणि अन्नपूर्णा देवींशी बोलणारे, सर्व जनांना सुखी करण्यासाठी धावणारे आणि प्रज्ञापुरीमध्ये स्थिर झालेले आहेत.

२८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट दूर होते.

फलप्राप्ती झाल्यानंतर एखादे सत्कर्म करावे.

Sharing Is Caring:
       

Leave a Comment

Index